खेड(प्रतिनिधी)मुंबई गोवा महामार्गा वरील असगणी येथील एस आर फाटा नजिक क्रेन ने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी वरील ६७ वर्षीय दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला होता त्याचे २४ रोजी सकाळी ६ वा च्या सुमारास उपचार सुरू असताना निधन झाले या प्रकरणी क्रेन चालक याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
रामचंद्र विठ्ठल जाधव (वय ६७ रा. असगणी समर्थनगर ता. खेड) असे त्या निधन झालेल्या प्रौढाचे नाव आहे. तर हायड्रा क्रेन चालक पप्पुकुमार नार्जना यादव वय १९ रा. मुळ बिहार, सध्या घाणेखुंट ता खेड असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे









