अनबॉक्स युअर डिझायर आणि पुर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी मध्ये ई यंत्रण या उपक्रमाच्या अंतर्गत मेगा ड्राईव्ह होणार आहे.
आपणही समाजाचे काही देणे लागतो हे लक्षात घेऊन गेले अनेक महिन्यांपासून अनबॉक्स युअर डिझायर ‘प्लास्टिक कचरा संकलन’ आणि ‘जुने कपडे संकलन’ हे सामाजिक उपक्रम राबवत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अनबॉक्स युअर डिझायर कडून प्लास्टिक कचरा आणि जुने कपडे संकलन केले जाते व ते रिसायकलिंग ला दिले जाते. त्याचप्रमाणे अनबॉक्स युअर डिझायर तर्फे २६ जानेवारी व त्यानंतर देखील प्लास्टिक कचऱ्यासोबत ई-कचऱ्याचे देखील संकलन केले जाणार आहे.
पुर्णम इकोव्हिजन फाउंडेशन ही संस्था गेली 10 वर्ष पर्यावरण विषयात पुण्यात काम करत आहे. ‘कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि जास्तीत जास्त लोक सहभागातून शाश्वत विकास’ या मूलभूत गोष्टीवर पुर्णम इकोव्हिजन फाउंडेशन काम करते. जुन्या कपड्यांपासून नवीन उत्पादने बनवणे आणि त्याची विक्री व्यवस्था. याला’ परिपूर्णम’ असे नाव दिले आहे. ई यंत्रण या उपक्रमांतर्गत आपण ई-वेस्ट (सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तू ज्या आपल्याला आता नको आहेत) गोळा करून त्यावर प्रक्रिया करून ते पूनर्वापरासाठी डोनेट करणे. ग्रीन कन्सल्टन्सी या उपक्रमांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि कम्पोस्टिंग करून दिले जाते.
ई यंत्रण या उपक्रमाच्याअंतर्गत पुर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि अनबॉक्स युअर डिझायर यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी मध्ये २६ जानेवारी या दिवशी मेगा ड्राईव्ह होणार आहे. २६ जानेवारी या दिवशी ई- वेस्ट कलेक्शन करण्यात येणार आहे. त्या दिवशी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत ई- वेस्ट कलेक्शन केले जाईल. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग आवश्यक आहे, जेणेकरून ई- वेस्ट योग्य ठिकाणी रिसायकलिंग साठी देता येईल व त्यापासून होणारे पर्यावरण प्रदूषण रोखता येईल.
ई-कचऱ्यामध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे –
फ्रीज, वॉशिंग मशीन, प्रिंटर, कॉम्पुटर, फॅन्स, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह, पेनड्राईव्ह, टीव्ही, डिजिटल कॅमेरा, एसी, व्हीडिओ कॅमेरा, सीडी / डीव्हीडी प्लेयर, मोबाईल फोन, होम थेटर्स, चार्जर्स, हेडफोन्स, आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स वर्किंग ऑर नॉन वर्किंग आणि डिस्पोझेबल वस्तू,
ई-कचऱ्यामध्ये समाविष्ट नसलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे-
फ्लोरोसंट ट्यूबलाईट्स, इनकॅन्डेसन्ट बल्ब्स, सीएफएल्स
खाली दिलेल्या संकलन केंद्रावर सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ई- कचरा गोळा करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी २६ जानेवारी रोजी आपल्या जवळच्या केंद्रावर आपल्याकडील ई-कचरा नेऊन द्यावा अशी विनंती पुर्णम इकोव्हिजन फाउंडेशन आणि अनबॉक्स युअर डिझायर तर्फे करण्यात येत आहे.
‘ई-यंत्रण’ या ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियानांतर्गत संकलन केंद्र म्हणून सहभागी होणारी केंद्र –
अनबॉक्स युअर डिझायर 8767461499 नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी
आगाशे फूडकोर्ट – 9209414199 संभाजी नगर, रत्नागिरी
सावंत रोडलाईन्स – 9423297470 साळवी स्टॉप, रत्नागिरी
धन्वंतरी मेडिकल्स – 9665055654 मारुती मंदिर, रत्नागिरी
अभिजित करंबेळकर 9421079654 शांतीनगर, रत्नागिरी
सुवर्णसूर्य फाउंडेशन – 9699777121 – शेरेनाका, रत्नागिरी
मानस किराणा स्टोअर 9011662220 माळनाका, रत्नागिरी
डी. के. जोशी सन्स 9422052613 जिल्हा परिषद, रत्नागिरी
आर्यक सोल्युशन्स – 9420907533 रमेश नगर, रत्नागिरी
अनिकेत कोनकर-9423292162 खेडशी, रत्नागिरी
हॉटेल सी फॅन्स – 9822290859- मांडवी, रत्नागिरी
हर्ष दुडे – 9604214101 – कारवांचीवाडी, रत्नागिरी
खादाडी कट्टा – 8668201414 जोशी पाळंद, रत्नागिरी
चिट चॅट क्लब – 7387066767 थिबा पॉईंट, रत्नागिरी











