रत्नागिरी: आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण रत्नागिरी आकाशवाणीवरून सोमवारी होणार आहे. ‘इंद्रधनुष्य’ या विशेष कार्यक्रमांतर्गत हे सत्र आयोजित करण्यात आले आहे.
आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री जिंदल हे ‘जनगणना’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचे तपशील खालीलप्रमाणे
दिनांक: सोमवार, २७ एप्रिल २०२६
वेळ: सकाळी ९:३० वाजता
विषय: जनगणना – मार्गदर्शन
संवादिका: अनघा मगदूम
सादरकर्ते: विवेक वानखडे
श्रोते हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या ११४३ kHz किंवा १०१.५ MHz FM वाहिनीवर ऐकू शकतात. ‘newsonair’ या मोबाईल ॲपद्वारे देखील हे मार्गदर्शन थेट ऐकू शकतील.
जनगणनेचे महत्त्व आणि त्यातील प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी हा कार्यक्रम ऐकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











