कुडाळ -*सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संस्थेचे 30 वे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ कै. पुण्यशोल्क बापूसाहेब महाराज स्मारक सभागृह कुडाळ येथे दिनांक रविवार 19जाने रोजी दुपारी 2 ते 5.30 यावेळेत आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सतीश सावंत हे भूषवणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद गवस सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्था अध्यक्ष इंद्रजीत सावंत, कार्याध्यक्ष शशिकांत गावडे, सरचिटणीस प्रभाकर परब, स्वागताध्यक्ष सोमदत्त चव्हाण, कुडाळ समिती प्रमुख रामचंद्र परब, सावंतवाडी समिती प्रमुख विठ्ठल नाईक, समन्वयक नंदकिशोर गावडे, समन्वयक सुरेश गवस आदी उपस्थित राहणार आहेत. संस्थेच्या सर्व न्याती बंधू भगिनींनी आणि गौरव करण्यात येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी या समारंभाला उपस्थित राहून स्नेहभाव वृद्धिंगत करावा. असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
कै पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज सभागृह कुडाळ यांच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा तरी सर्वांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.










