कोकिसरे बांबरवाडी येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी व पदाधिकारी उपस्थित

वैभववाडी | प्रतिनिधी :कोकिसरे बांबरवाडी येथील मारुती मंदिराकडे जाणा-या रस्ता डांबरीकरण चा शुभारंभ वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या फंडातून या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.कामाच्या शुभारंभ प्रसंगी कोकिसरे गावचे सरपंच श्री. अवधूत नारकर, माजी सैनिक श्री विनोद आयरे, माजी सरपंच श्री प्रकाश पांचाळ, माजी सरपंच श्री दत्ताराम सावंत, श्री अनंत नेवरेकर, शक्ती केंद्र प्रमुख प्रदीप नारकर, श्री मधुकर जाधव, व इतर सर्व बांबरवाडी येथील सर्व नागरिक व भारतीय जनता पक्ष चे कार्यकार्यें उपस्थित होते.