वैभववाडी l प्रतिनिधी : विद्या मंदिर करूळ गावठण अ प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका ज्योती जयवंत पवार यांना ” गुरुसेवा गौरव पुरस्कार सन 2023″ जाहीर झाला आहे. नाम. दिपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या मार्फत शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील व चांगले शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. ज्योती पवार यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
ज्योती पवार या एडगाव पवारवाडी गावच्या रहिवासी आहेत. सौ. पवार यांनी पांडुरंग स्कूल फणसगांव देवगड, वि. मं. करुळ जामदारवाडी, वि. मं. कोकिसरे नारकरवाडी याठिकाणी सेवा बजावली आहे. सद्या त्या विद्या मंदिर करूळ गावठण अ या शाळेत कार्यरत आहेत. उपक्रमशील शिक्षिका अशी त्यांची ओळख राहिली आहे. बालकला क्रीडा स्पर्धा, ज्ञानी मी होणार, शिष्यवृत्ती स्पर्धा, मंथन स्पर्धा, प्रज्ञाशोध स्पर्धा, ए.पी.जे. अब्दुल कलाम परीक्षा स्पर्धा आदी स्पर्धा परिक्षेत त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
सन 2018 मध्ये त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
या वर्षीचा “गुरुसेवा गौरव पुरस्कार सन 2023” त्यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. नाम .दिपक केसरकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. सौ.ज्योती जयवंत पवार यांचे तालुक्यातील शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन समिती करूळ, एडगाव ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे. वैभववाडी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्रप्रमुख श्री. गोसावी यांनी देखील सौ. पवार यांचे अभिनंदन केले.











