मातोश्री वृद्धाश्रम सांगवे- भिरवंडे येथे निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवलीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे आयोजन

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम सांगवे- भिरवंडे येथे आयोजित करण्यात आले होते . शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना रुजवणे आणि समाजसेवेची वृत्ती विकसित करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

 

कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत, सांगवे गावचे सरपंच संजय सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस.बाडकर,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. अरविंद कुडतरकर, प्रा. डॉ.एस.टी. माने , सर्व‌‌ विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.डी.एस. बाडकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिबिराच्या महत्त्वाबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.संजना सावंत यांनी एनएसएस शिबिरांमधून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी राष्ट्र भावना ,सामाजिक बांधिलकी याबद्दल आपले विचार व्यक्त केले.सूत्र संचालन समृद्धी सावंत भोसले आणि कार्यक्रमाची सांगता तुकाराम नाईक यानि केली.राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी विकी राठोड, वैभवी गिरकर, ललित कासवकर, समृद्धी सावंत भोसले यानी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

महाविद्यालयीन अभ्यासक्रमाला राष्ट्रसेवेची जोड देऊन राष्ट्रोद्धार कसा साधता येईल,या साठी सामाजिक समस्यांबद्दल जागरुकता वाढवणे, स्वयंसेवा आणि सहकार्याची भावना विकसित करणे, नेतृत्व गुण विकसित करणे, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कल्याणासाठी कार्य करणे. शिबिरात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, वृद्धाश्रम भेट, रक्तदान शिबीर आणि कौशल्य विकास कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपल्या महाविद्यालयाचे चे संस्थापक मा. खा.नारायणरावजी राणे साहेब संस्थेचच्या अध्यक्षा मा. सौ. निलम ताई राणे उपाध्यक्ष मा.आ. निलेशजी राणे , सचिव मा. ना. नितेशजी राणे बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे बहुमुल्य प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.