मंडणगड l प्रतिनिधी : सोमवार दि. 13 जानेवारी 2025 रोजी रात्रौ 1.55 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रिय महामार्ग क्रं.965 डी,वर मंडणगड ते म्हाप्रळ दरम्याने शेनाळे घाटामध्ये चिंचाळी धरणा जवळ दाभोळ मुंबई एस.टी. बस रस्ता सोडून 15 फुट खाली घसरून पलटी होवून अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. यावेळी गाडीमध्ये 41 प्रवासी प्रवास करत होते. गाडी क्र. एम.एच.14.बि.टी. 2265 हि दापोली आगाराची गाडी दापोलीहून मुंबईकडे प्रवास करत होती. गाडीचे चालक व्हि.एस. गावडे व वाहक मंदार भोईर हे होते. मंडणगड हनू गाडी मुंबईकडे रवाना झाली असताना शेनाळे घाटात चिंचाळी धरणा नजीक गाडी रस्ता सोडून सूमारे 15 फुट बाजुला पलटी झाली. यावेळी समोर असलेल्या झाडाला एस.टी अडकल्याने गाडीतील सुमारे 41 जणांचे प्राण वाचले. गाडी झाडाला अडकली नसती तर ती खोल दरीतील धरणामध्ये थेट कोसळली असती. अपघातामध्ये दापोली तालुक्यातील सर्व प्रवासी होते. अपघातावेळी या मार्गावर प्रवास करणारे रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यातील चैक येथील मनोज थोरवे व त्यांचे सहकारी मदतीसाठी थांबलेे या दरम्याने मंडणगड येथील सचिन चव्हाण व गोठे गावातील जितेंद्र दवंडे हे कोस्तुभ भिंगार्डे यांच्या श्री रूग्ण वाहिकेने अन्य रूग्णाला घेवून मुंबईला जात होते. चव्हाण यांनी एस.टी. बस पलटी झालेली पाहून स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत गाडीत प्रवेश करून बचाव कार्यास सुरूवात केली. त्यांनी गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरूवात केली. त्याबरोबर गाडीतील काही तरुण प्रवासी तसेच जितेंद्र दवंडे, मनेाज थोरवे, व त्यांचे सहकारी, त्याच बरोबर नगरसेवक मुश्ताक दाभीळकर यांनी सहकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच मंडणगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय धुपकर, पोलीस हवालदार गणेष चव्हाण, पोलीस काॅन्स्टेबल सुहास मांडवकर, विशाल कोळथरकर, महेंद्र तांदळे, आकाराम माने यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. जखमी प्रवाशांना मंडणगड ग्रामिण रूग्णालयाच्या रूग्ण वाहिकेने मंडणगड ग्रामिण रूग्णालयात आणून प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
चैकट
राष्ट्रिय महामार्गाचे काम सुरू असल्याने ठिक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे काही ठिकाणी रस्ता रूंद तर काही ठिकाणी एकेरी वाहतुक सुरू आहे. याठीकाणी मार्गदर्शक फलके लावण्यात यावी अशी मागणी होत आहे.
घाटामध्ये धोक्याच्या ठिकाणी संरक्षक कठडा होण्याची मागणी होत आहे. या आधीहि सुमारे चार वर्षांपूर्वी याच ठिकाणवरून डंपर धरण क्षेत्रात कोसळून एका तरूणाचा जिव गेला होता. त्यामुळे याठीकाणी संरक्षक भिंत व्हावी अशी मागणी होत आहे.
आपत्ती जनक परिस्थितीत संपर्क साधावा कुणाशी असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे गेले महिनाभर मंडणगड पोलीस चालकाचा दूरध्वनी क्रमांक बंद आहे त्यामुळे अशी आपत्ती जनक परिस्थिती निर्माण झाल्यास संपर्क कोणाशी साधावा असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडत आहे काल झालेल्या अपघाताची माहिती देण्याकरिता नागरिकांनी मंडणगड तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन व दवाखान्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या तिन्ही ठिकाणाचे फोन बंद असल्याने संपर्क साधता आला नाही त्यामुळे आपत्ती जनक परिस्थितीमध्ये तालुक्यातील नागरिकांनी कोणाशी संपर्क साधावा असा सवाल निर्माण झाला आहे











