जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात उत्कृष्ठ गोलंदाज ठरला कळंबट शाळेचा शंतनू सुनिल घाणेकर

चिपळूण : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट सामन्यात चिपळूण तालुका संघ अंतिम विजयी ठरला. त्यामध्ये उत्कृष्ठ गोलंदाजचा मानकरी ठरला कळंबट शाळेचा विद्यार्थी कु. शंतनू सुनिल घाणेकर. याचे सर्व स्तराहून कौतुक होत आहे.

 

सावर्डे येथे झालेल्या जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत जिल्हा परिषद रत्नागिरी(शिक्षण विभाग) आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा मधील क्रिकेट स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील संघांचा सहभाग होता. त्या मध्ये अंतिम सामना हा चिपळूण तालुका विरुद्ध संगमेश्वर तालुका यांच्या मध्ये झाला आणि त्या मध्ये चिपळूण तालुका या संघाने सामना जिंकून अंतिम विजेता पदाचा मान पटकावला त्या सामन्यामध्ये चिपळूण तालुक्यातील संघामध्ये कोंडमळा गावचा सुपुत्र परंतु सध्या कळंबट कुडूकवाडी येथे वास्तवास असलेला तसेच जिल्हा परिषद शाळा कळंबट नंबर 1 कुमार शंतनू सुनिल घाणेकर याची चिपळूण तालुका संघामध्ये निवड झाली होती. तसेच जिल्ह्याच्या अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शंतनू घाणेकर याला पुरस्कृत करण्यात आले त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ कळंबट कुडूकवाडी व नवतरुण विकास मंडळ कळंबट कुडूकवाडी (मुंबई) तर्फे शंतनू व सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.