पेढे मोरेवाडी रस्त्याचे माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन
संतोष कुळे lचिपळूण : भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, जीवनात प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठी होत असते. ही आलेली वेळ सुद्धा निघून जाईल, असा संदेश ते आपल्याला देतात. आपण सुद्धा या गोष्टीतून काहीतरी बोध घेण्याची गरज आहे. मला सुद्धा जनतेची सेवा करताना निश्चितच आनंद आणि समाधान प्राप्त होते. आपण आता आमदार नसलो तरी जमेल तशी जनतेची सेवा करीत राहू, असे मत त्यांनी पेढे मोरेवाडी येथील रस्त्याचे उद्घाटन आणि कीर्तन महोत्सव शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
शिवसेना उपनेते तथा माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नाने जनसुविधा कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेल्या पेढे मोरेवाडी रस्ता डांबरीकरण कामाचे उदघाटन माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्रीराम वारकरी संप्रदाय पेढे मोरेवाडी आयोजित कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात पुढे बोलताना श्री चव्हाण म्हणाले की, श्रीराम मंदिराकडे जाणारा रस्ता हा होणे गरजेचे होते. कारण याच रस्त्यावरून विठ्ठलाचे वारकरी ये जा करतात. पेढे मोरेवाडी येथील सर्व ग्रामस्थांचे आपल्यावर प्रेम आहे. आपले हे नाते असच वाढत राहील. गत वर्षी ही कीर्तन महोत्सवाला आलो होतो. आपण कीर्तनातून नवीन पिढीला एक उत्तम संस्कार देत आहात ही फार मोठी गोष्ट आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी अभय सहस्रबुद्धे यांनीही मोरेवाडीमधील ग्रामस्थांचे आणि महिलांचे कौतुक केले. त्यानंतर पत्रकार भाई कुळे यांनी ही आध्यात्मिक मार्गातील काही गोष्टी कथन केल्या.
उपस्थित सर्व मान्यवरांचे मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांनी पेढे मोरेवाडी रस्त्याचे काम मंजूर करून काम तातडीने पूर्ण करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करून सदानंद चव्हाण यांचा सन्मान केला. यावेळी भगवान परशुराम देवस्थान ट्रस्ट विश्वस्त अभय सहस्त्रबुद्धे, शिवसेना विभागप्रमुख जनार्दन मालवणकर, माजी सरपंच संतोष चोपडे, प्रविण पाकळे, पत्रकार भाई कुळे, मोरेवाडी अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे, ह.भ.प. विकास महाराज बाचिम, पांडुरंग महाराज भैरवकर, बांद्रे महाराज, राजन महाराज बाचिम, कृष्णा महाराज पिटले, गणेश महाराज आदवडे, अशोक महाराज जुवळे, हरिश्चंद्र महाराज पडवेकर, नामदेव मोरे, गावकर जनार्दन मोहिते, मधुकर मोरे, भास्कर आदावडे, चंद्रकांत चांदिवडे, मधुकर मोरे, महिला मंडळ अध्यक्षा वैशाली पवार, उपाध्यक्षा नीलम मोरे, ग्रामपंचायत सदस्य रणजित मोरे, बापू संसारे आणि वारकरी संप्रदाय पेढे मोरेवाडी व पंचक्रोशी आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच दीपक मोरे यांनी केले.











