रत्नागिरी ः प्रतिनिधी : फलॅट भाडयाने घेण्याच्या बहाण्याने ऑनलाईन डिपॉझिट देण्याची बतावणी करत आपला क्यु आर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगून तब्बल 80 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.ही घटना शुक्रवार 12 मे रोजी सायंकाळी 4.49 ते 4.57 वा.कालावधीत कुवारबाव येथे घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दिपक पवार (रा.दिल्ली) या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.12 मे रोजी फिर्यादी यांनी आपलया फलॅट भाड्याने देण्यासंदर्भात ओएलक्सव जाहिरात दिली होती.ती पाहून संशयित दिपक पवारने फिर्यादींना फोन करुन तुमचा फलॅट आवडला असून डिपॉझिट 16 हजार रुपये भरण्यासाठी फिर्यादीला आपला क्युआर कोड पाठवला.
त्यानंतर फिर्यादीच्या आईचे गुगल पे नंबरवर क्युआर कोड स्कॅन करा असे सांगून त्यांच्याच बँक खात्यातून दोन वेळा 16 हजार आणि एकदा 48 हजार रुपये असे एकूण 80 हजार रुपये काढून फसवणूक केली.डिपॉझिट घेण्याऐवजी आपल्याच खात्यातून तब्बल 80 हजार रुपये वजा होउन ते दिपक पवारच्या खात्यात जमा झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच त्याने शनिवार 13 मे रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.








