आंबोली केंद्र प्रमुख आर बी गावडे यांची उपस्थिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोली ग्रामपंचायत च्या वतीने या वर्षी पासून आंबोलतील विध्यार्थीच्या कला गुणांना वाव देण्यासाठी “आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा” चे आयोजित केले. या स्पर्धा मध्ये वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
आंबोली केंद्राचे नाव नेहमीच तालुका व जिल्हा व राज्य स्तरावर शैक्षणिक, क्रीडा व कला गुणांसाठी चर्चेत व स्पर्धेत असते.
आंबोली केंद्रात येथील केंद्रप्रमुख श्री आर बी गावडे सर यांच्या संकल्पनेतून आंबोली सारख्या डोंगराळ व एका टोकाला असलेल्या गावातील मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर व ग्रामपंचायत आंबोलीतील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतच्या माध्यमातून या वर्षी पासून आंबोली ग्रामस्तरीय कला नैपूण्य स्पर्धा सुरु करण्यात आली. या स्पर्धेला आंबोली केंद्रातील सुमारे 80 मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आंबोली केंद्र प्रमुख श्री आर बी गावडे सरांनी व त्यांच्या सहकारी शिक्षकानी केले होते. वक्तृत्व स्पर्धा मराठी हिंदी इंग्रजी भाषेत पार पडली तर चित्रकला व रंगभरण तीन गटात पार पडली.
या वेळी मंच्यावर आंबोली ग्रामपंचायत सदस्य सौ स्वप्नीता कर्पे, श्री काशीराम राऊत, श्री शंकर चव्हाण उपस्थित होते. शिक्षणतज्ञ व शिक्षणप्रेमी श्री वामन पालेकर यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री एकनाथ सुतार, श्री डॉक्टर चंद्रकांत सावंत, श्रीमती वसुंधरा सुर्वे, श्री एस के गावडे, श्री चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेवेळी आंबोली केंद्रातील श्रीम. सुलोचना तेरसे, श्री अवधूत जाधव, श्री अमोल कोळी, श्रीमती हंसा गवस, श्रीम रजिया शेख,श्री अनिलकुमार चाळुचे, श्री अविनाश शिरगिरे सर इत्यादी शिक्षक तसेच आंबोली शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.










