कारुळ प्रीमिअर लीग पर्व 4 चे उद्यापासून आयोजन

गुहागर | प्रतिनिधी : कालिका वॉरीअर्स आयोजित कारूळ प्रीमिअर लीग पर्व 4 चे उद्यापासून आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि 18 व रविवार दि 19 रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे.
सदर स्पर्धेचे उदघाटन शनिवारी सकाळी 8.30 वाजता पार पडणार असून त्यानंतर साखळी सामने पार पडणार आहेत.तर रविवारी सकाळी 8.30 वा साखळी सामने व त्यानंतर 4.30 वाजता अंतिम सामना व बक्षिस वितरण पार पडणार आहे.यादरम्यान भव्य लकी ड्रॉ देखील होणार आहे.कारूळ तळ मैदान येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.तरी सदर स्पर्धेचा क्रीडाप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.