गुहागर l प्रतिनिधी : मुंढर फाटा ते वडद फाट्या पर्यंतचा दोन किमी रस्त्याचे भूमी पूजन नुकतेच संपन्न झाले.पालकमंत्री उदय सामंत यांचे सहकारी आणि शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख मुन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हे भूमिपूजन पार पडले.शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख दीपक कनगुटकर यांच्यासह भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे,मनसेचे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी,शिवसेना उजिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के हेदेखील उपस्थित होते.मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंढर फाटा ते वडद फाट्या पर्यंतचा रस्ता होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या माजी सरपंच सुशील आग्रे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
यावेळी मूंढर गावचे सरपंच प्रदीप अवेरे,माजी सरपंच व पालशेत जिल्हा परिषद गटाचे उप तालुका प्रमुख सुशील उर्फ बबलू आग्रे, उपसरपंच बेलवलकर मॅडम तसेच मूंढर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सर्व आजी-माजी सदस्य तसेच सचिन ओक,विनायक लांजेकर,रोहन भोसले,मुन्ना तावडे,संतोष आग्रे, हनुमंत शिर्के,अविनाश शिर्के,अजित गमरे संतोष लांजेकर,अनिल जाधव,सागर सुर्वे त्याचबरोबर पश्चिम आग्रे वाडी अध्यक्ष, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने महिला वर्ग व तरुण वर्ग उपस्थित होता.










