(पर्व दूसरे)
उत्सव गावाचा… जल्लोष तरुणाईचा..!
मोडकाआगर | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील सुरळ येथील श्री वाघजाई देवी क्रिकेट संघ पुरस्कृत सुरळ प्रीमियर लीग २०२५
(पर्व दूसरे) दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी भव्य कोहर फार्म ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा बागकर स्टॉप, सुरळ, वाघजाई देवी मंदिरासमोर येथे
संपन्न होणार आहे. या स्पर्धा उत्सव गावाचा जल्लोष तरुणाईचा या शीर्षकाखाली होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये संदीप मोहिते( ब्लू फायटर्स),प्रदिप जड्याळ(संस्कार फायटर्स),योगेश आग्रे (जय हनुमान इलेव्हन),बाळू बागकर (बाळू इलेव्हन), संकेत रावणंग(मोरया इलेव्हन),दिनेश मुर्डेकर (आराद्य वॉरीयर्स), आकाश चव्हाण( गावदेवी इलेव्हन)
गीतेश मोहिते (नित्या इलेव्हन) आदी संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये तर द्वितीय क्रमांकास १५ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर यांना भेटवस्तू देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी बाळू बागकर, संकेत रावणंग, जगु भोसले, रोहन चव्हाण, नईम दळवी, राज चव्हाण, राज बागकर यांना संपर्क करावे या स्पर्धा youtube लाईव्ह असून या स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा असे आवाहन श्री वाघजाई क्रिकेट संघ सुरळ यांनी केले आहे.










