सुशील भायजे धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटातून लढणार

आम.शेखर निकम यांचे खंदे समर्थक..

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर (४०) जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस चे धामापूर गावचे सुपुत्र् सुशील भायजे इच्छुक आहेत.या जिल्हा परिषद गटातून सुशील भायजे निवडणूक लढवणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे.
सुशील भायजे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक.कार्याध्यक्ष आहेत.तर संगमेश्वर चिपळूण मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांचे खंदे कार्यकर्ते व निकटवर्तीय समजले जातात.गतवर्षी झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटाने आम शेखर निकम यांना निर्णायक लीड दिल्याने विजय सुकर झाला होता.हे.मताधिक्य मिळवून देण्यात सुशील भायजे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस ची चांगली पकड असल्याचे,विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाले होते.सुशील भायजे यांचे समवेत राष्ट्रवादी पक्षाचे काम करणाऱ्या शेखर उकार्डे,शशिकांत घाणेकर,सुरेश कांगणे,महेश बाष्टे,गणपत चव्हाण,श्रीमती अंकिता चव्हाण,अक्षय चव्हाण,सुरेश घडशी (मुंबई संपर्क प्रमुख),संतोष गोटेकर,दीपक जाधव,अशी मोठी फौज आहे.सुशील भायजे ह्यांचा जनसंपर्क तगडा असल्याने,सुशील भायजे निवडणुकीला रिंगणात उतरल्यास त्यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
सुशील भायजे यांनी आम.शेखर निकम यांच्या माध्यमातून धामापूर तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटात अनेक कामे मार्गी लावलेली असून,त्यांनी वैयक्तीक कामांवर भर दिला आहे.
पुढील काळात युती म्हणून लढतांना शिंदे गटाकडून व भाजपा कडून कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.