The problems in the village hall include staff fatigue, fewer trains, machines, and shortage of ticket rolls
खेड | प्रतिनिधी : ऐन गर्दीच्या हंगामात येथील आगारातील अनेक समस्यांनी प्रवाशी, कर्मचारी बेजार झाले आहेत. डिझेल नाही, गाड्या कमी, मशिन्स आणि तिकीटच्या रोलचा तुटवडा यामुळे खेड आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.
कोरोनामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटीला सद्याचा लग्नसराई आणि सुट्टीचा हंगाम आर्थिक उत्पन्न वाडीसाठी लाभदायक ठरत असताना. आगारातील समस्यांमुळे प्रवासी आणि चालक वाहक यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खेड आगारातुन लग्नसराई आणि लांब पल्ल्यासाठी ज्यादा गाड्यांचे बुकिंग फुल झालेले असताना ग्रामीण भागातील प्रवाशांचा ओढा एस टी कडे वाढलेला दिसत आहे. अशा परिस्थितीत एसटीच्या कमी गाड्यांमुळे ग्रामीण भागातील फेऱ्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. गाड्यांच्या कमतरतेमुळे प्रसंगी ग्रामीण फेऱ्या रद्द ही होत असल्याचे चित्र दिसत आहे.
मशीन आणि तिकीट रोलचा तुटवडा
खेड आगारात एकूण १८० मशिन्स होत्या त्यापैकी नादुरुस्त आणि बंद पडलेल्या मशीन रत्नागिरी येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्याअध्यापही आलेल्या नसल्याने आगारात मशीनचा तुटवडा जाणवत आहे. अस्तित्वात असलेल्या मशीन कालबाह्य झालेल्या आहेत. मशीन शिवाय वाहकाला कर्तव्यावर रुजू होता येत नाही. जादा वाहतुकीसाठी तिकीट मशीन उपलब्ध होत नसल्याने गाड्या उशिरा सुटत आहेत. तिकिटासाठी लागणाऱ्या कागदी रोलचा विभागाकडून पुरवठा करण्यात आला नाही. मशीन मिळाली तर रोल उपलब्ध होत नाही. बाजारात खाजगी मशिन्ससाठी मिळणारे रोल विकत घेऊन कर्मचाऱ्यांना ड्युटी करावी लागत असल्याचे कर्मचारी खेदाने सांगत आहेत.
डिझेल पंप नादुरुस्त
गेल्या ४ महिन्यांपासून खेड आगारातील डिझेल पंप बिघडलेला आहे. दुरुस्तीसाठी कंपनीला कित्येकदा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु कंपनीकडून आणि महामंडळ प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे डिझेल उपलब्ध होत नाही. यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्यांवर याचा मोठा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी कमी गाड्यांमध्ये खेड आगाराने एक कोटीच्या वर उत्पन्न मिळवले होते. परंतु महमंडळाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे खेड आगारातील रोज १५०० ते २००० कि. मी. रद्द होण्याची नामुष्की ओढवत आहे.
बंद बोरिंगचा कर्मचाऱ्यांना फटका
आगारात पाण्यासाठी बोरिंगचा आधार आहे. गेल्या काही दिवसांपासून बोरिंग मधील पंप नादुरुस्त झाल्यामुळे पाण्याचा पुरवठा बंद आहे. कर्मचाऱ्यांना आंघोळीसाठी, पिण्यासाठी, प्रातविधीसाठी पाणीच उपलब्ध होत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर महामंडळ लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे. त्यांना प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याची गंभीर दखल विभागनियंत्रक श्री. प्रज्ञेश बोरसे यांनी घेऊन प्रवासी आणि कर्मचारी यांना दिलासा द्यावा. अशी मागणी होत आहे