रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या अध्यक्षपदी आनंद त्रिपाठी यांची फेरनिवड

लांजा (प्रतिनिधी) जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी वाटूळ हायस्कूलचे शिक्षक आनंद त्रिपाठी यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेची सभा आरवली संगमेश्वर येथे संपन्न झाली. रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील 13 दिव्यांग संघटनांनी एकत्रित जिल्हास्तरावर दिव्यांगांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी समन्वय समितीची स्थापना व नोंदणी 2021 मध्ये केली होती. तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्याने कार्यकारणी मध्ये बदल करण्यात आले. शासनमान्य दिव्यांग कर्मचारी संघटना व सर्वसामान्य दिव्यांगांसाठी काम करणारी समन्वय समिती एकत्रितपणे जिल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सांगितले लवकरच दिव्यांगांचे तारणहार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत दिव्यांगांचा खुला अधिवेशन घेणार असल्याचा मानस त्रिपाठी यांनी व्यक्त केला.

 

आरवली संगमेश्वर येथे विजय कदम यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या जिल्हा कार्यकारणी सभेत कार्यकारणीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले 2025 ते 2028 या तीन वर्षासाठी पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष म्हणून आनंद त्रिपाठी यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी सादिक नाकाडे (रत्नागिरी), उपाध्यक्ष म्हणून अशोक भुस्कुटे (चिपळूण), विजय कदम (संगमेश्वर) तर सचिवपदी अशोक जायभाय (संगमेश्वर) व खजिनदार म्हणून अमित आदवडे (चिपळूण), सहसचिव म्हणून संजय कळमुंडकर यांची निवड झाली.तसेच लांजा तालुका समन्वयक पदी गौतम सावंत व गणपत कुर्तडकर चिपळूण साठी रवींद्र मोहिते, गुहागर समन्वयक पदी मुकणाक व भरत कदम, राजापूर समन्वयक म्हणून विनायक पवार व डोंगरकर यांची निवड करण्यात आली .

 

ज्या तालुक्यांमध्ये दिव्यांग संघटना कार्यरत नाही तिथे समन्वय समितीची तालुका शाखा स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. लांजा तालुक्यामध्ये अपंग संस्था कार्यरत असल्याने समन्वय समितीची लांजा शाखा बरखास्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला सभेत मध्ये प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी तर आभार सचिव अमित आडवडे यांनी मानले.