पोदार प्रेप मध्ये वसुंधरा दिन पंचमहाभूत -निसर्गातील पाच घटक ह्या संकल्पनेने साजरा

रत्नागिरी : येथील कारवाची वाडी मधील पोदार प्रेप ह्या शाळेमध्ये विद्यार्थी “पंचमहाभूत” – निसर्गातील पाच घटक या संकल्पनेवर आधारित विशेष आणि अर्थपूर्ण कार्यक्रमाद्वारे पृथ्वी दिन साजरा केला.

पृथ्वी (Prithvi), पाणी (Jal),अग्नी (Agni),वायू(Vayu),आकाश (Akash) निसर्गातील हे पाच घटक जे आपल्या जीवनामध्ये समतोल, सुसंवाद ठेवतात.
वयोगटानुसार योग्य कथा, मजेदार उपक्रम आणि संवादात्मक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना हे समजेल की हे पाच घटक पृथ्वीवरील जीवन कसे समर्थित करतात आणि आपण निसर्गाचा आदर व संरक्षण का केले पाहिजे ह्याची माहिती मुलांना देण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि जबाबदारीची भावना निर्माण केला गेला तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनात साध्या पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले गेले.
आपण घरी पाण्याची बचत, परिसर स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे आणि निसर्गाची काळजी घेणे याबद्दल मुलांशी चर्चा केली गेली.
सर्वांनी मिळून आपल्या मुलांना सजग आणि जबाबदार पृथ्वीचे नागरिक बनवूया अशी प्रतिज्ञा केली गेली.
वसुंधरा दिवसाची संकल्पना शाळेच्या प्रेसिडेंट डॉ. स्वाती पोपट वत्स यानी केली होती.