किंजवडे येथील तीन शाळांचा सहभाग
शिरगाव (प्रतिनीधी) देवगड तालुक्यातील निसर्गरम्य किंजवडे गावातील जि. प. प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी,किंजवडे डोबवाडी व किंजवडे कोलझर या तीन शाळेचे संयुक्त वनभोजन निसर्ग सान्निध्यात नदीशेजारी असलेल्या आंबोळ ओहोळ किंजवडे येथील आंबा बागायतदार दत्तात्रय लाकम यांच्य्या बागेत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी मुले मनसोक्त निसर्ग रम्य कोकणच्या जंगलात मौज -मजा,नदी,डोंगर,बाग क्षेञभेट, मनसोक्त खेळ,माझी वसुंधरा अभियान उपक्रमात रमून गेले.तसेच खुमासदार शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला.तसेच यावेळी विद्यार्थ्यांना नारळ,पोफळी,केळी,अननस ,आंबा बाग, वेगवेगळी झाडे, फुलांची झाडे व त्यांचा उपयोग सांगण्यात आला.
या उपक्रमात पालक,माजी विद्यार्थी यांनीही उत्फुर्त सहभाग घेतला.आजच्या या उपक्रमाने संपूर्ण दिवस कसा गेला ते काही कळलेच नाही. या उपक्रमाला या शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका व शालेय पोषण आहार कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी हातभार लावल्याने उपक्रम यशस्वी झाला.माझी वसुंधरा अभियान ५.० उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत किंजवडे यांचेकडून क्षेत्रभेट व वनभोजनाचे नियोजन किंजवडे गावच्या परिसरात करण्यात आलेले होते.
या उपक्रमात या गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक, पंचक्रोशीतील शिक्षक वर्ग उपस्थित होते.
फोटो कॅप्शन: किंजवडे येथे शालेय पर्यावरणपूरक वनभोजन व क्षेञभेटीचे आगळा- वेगळा उपक्रम संपन्न झाला.










