राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील देवाचे गोठणे येथील पावसकर परिवाराच्या वतीने भवानी माता मंदिर पावसकरवाडी येथे शुक्रवार २४ जानेवारी रोजी सायं.६ वाजता त्रैवार्षिक गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायं.६ वाजता श्री भवानी देवीचा गोंधळ मांडला जाणार असून त्यानंतर रात्रौ ८.३० ते ११ वाजेपर्यंत भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पावसकर सहयोग मंडळ, पावसकर महिला मंडळ व पावसकर परिवाराचे वतीने करण्यात आले आहे.










