आमदार निलेश राणे आक्रमक : २५ जानेवारीला चिपळूण मध्ये ‘गर्जना’ सभा
मालवण | प्रतिनिधी : गोहत्या थांबवण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जायला तयार आहोत. कायदा हातात घ्यावा लागला तर तो घेऊ. आम्ही गो मातेचे भक्त आहोत. तरी गोभक्तांनी २५ जानेवारीला संध्याकाळी ५ वाजता चिपळूणमध्ये मोठ्या संख्येने गर्जना सभेच्या निमित्ताने एकत्र यावं. असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले.
ते म्हणाले, चिपळूण तालुक्यात काल रात्री 22 गुरे एका गाडीत सापडली. हिंदू बांधवाना संशय आला त्यांनी गाडीचं पाठलाग केला. त्यांना ही गुरे जखमी व बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. जमवाने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी कार्यवाही सुरु केली मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. ज्यांची गाडी आहे ते इकबाल आणि रुजवान अशी नावे समोर आली. या अगोदर पण तस्करी चे गुन्हे असताना हे जमिनावर बाहेर आहेत अशीही माहिती आहे. यापूर्वीही अश्या घटनेत हिच लोक होती. जुन्या सिनेमा स्टाईल पुढे मागे गाड्या व मध्ये गुरे वाहतूक गाडी घेऊन जात होते.
आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहोत कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चिपळूण मध्ये सायंकाळी 5 वाजता आपण गो मातेचे भक्त आहोत या उद्देशाने तेथे जमायचे आहे. जे सुरु आहे ते थांबले पाहिजे. कायदा हातात घ्यायचा झाल्यास घ्यावा लागेल. ही गर्जना या सभेत केली जाणार आहे. यात जे जे कोणी आहेत त्यांना कायद्याची भीती आहे की नाही हे सर्व या सभेत मांडणार आहे. प्रशासनालाही समजेल. अधिवेशनातही आवाज उठवणार. यांच्यावर मोक्का कायदा लागू व्हावा ही भुमिका राहणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
फोटो : आमदार निलेश राणे










