स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त पाळणेकोंड येथे पाच कल्पवृक्षांचे रोपण

जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन

सावंतवाडी । प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या जीवंत स्मारकाला अभिवादन करण्यात आले. कल्पवृक्षरूपी या स्मारकाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच नळपाणी योजनेच्या कामात जुन्या स्मारकाची जागा जाणार असल्याने शेजारी स्मारकरुपी पाच कल्पवृक्षांच रोपण नव्यानं करण्यात आले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जुने शिवसैनिक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह जुन्या शिवसैनिकांकडून पाळणेकोंड धरण येथील जिवंत स्मारकाला अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त लावलेल्या पाच कल्पवृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्या पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नळपाणी योजनेच्या कामात जुन्या स्मारकाची जागा जाणार असल्याने शेजारी स्मारकरुपी पाच कल्पवृक्षांच रोपण नव्यानं करण्यात आले असून जुन्या स्मारकाची रोपही अन्यत्र लावली जाणार आहेत. आजच्या दिवसाच औचित्य साधून नव्या पाच कल्पवृक्षांच रोपण जुन्या शिवसैनिकांकडून करण्यात आले‌. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, गणपत बांदेकर, दीपक सावंत, रत्नाकर माळी, बंड्या तोरसेकर, प्रसाद कुडतरकर, महेश नार्वेकर, संदीप नाईक तसेच पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब आदी उपस्थित होते.