सिधुदूर्ग-रत्नागीरी जिल्हा सहविचार सभा आ.ज्ञानेश्वर म्हात्रे व शिक्षण संचालक यांचे उपस्थितीत संपन्न

दोडामार्ग | प्रतिनिधी : कोकणातील शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक आ. ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण विभाग, श्री.चोथे शिक्षण उपसंचालक कोल्हापुर विभाग, सिंधुदुर्ग व रत्नागीरी जिल्हा शिक्षणाधिकारी, वेतनपथक अधिक्षक, लेखाधिकारी शिक्षण व इतर पदाधिकारी तसेच सिधुदुर्ग रत्नागीरी जिल्हा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सहविचार सभा नुकतीच शासकिय विश्राम गृह रत्नागिरी येथे संपन्न झाली यामध्ये अनेक विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात आल्याने कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे

यामध्ये शिक्षकेतरांच्या बाबतीत पुढील प्रमाणे चर्चा करुन निर्णय करण्यात आले.१) सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये २०१८ पासून पुरवणीबील फरक बील प्रलंबीत आहेत ती सत्वर मंजूर करणे २) शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. सिंधुदूर्ग गेले महिनाभर रजेवर असल्याने त्यांचा चार्ज इतर अधिकारी यांचेजवळ देवून प्रलंबित वेदयकिय बील मंजूर करुन ३१ मार्च पूर्वी वेतन पथककडून खर्ची घालावी. शिक्षकेत्तर लिपीका वरी ठ लिपीक पदोन्नती प्रस्ताव २०१८-१९ पासून प्रलंबीत आहेत पदोन्न्तीला बंदी नसल्याने ते तात्काळ मंजूर करण्याबाबत आदेशित करण्यात आले..०१ जानेवारी २०२४ पासून शिक्षकेत्तरांना दुसारी कालबध्द पदोन्न्ती मंजूर झाली आहे. संपूर्ण राज्यभरात सर्वच जिल्हयामध्ये हे काम पूर्ण झाले असून ते सिधुदूर्ग जिल्हयात प्रलंबित आहे. ते तात्काळ मंजूर करुन त्याची फरक बीले ३१ मार्च पूर्वी खर्ची घालावी असे आदेश देण्यात आले.५ अतिरीक्त वरीष्ठ लिपीक यांना त्याच प्रशालेत त्याच प्रशालेत कनिष्ठ लिपीक पदावर पदावनत करण्यात यावे. व कनिष्ठ लिपीकास अतिरीक्त करावे याबाबत आदेश देण्यात आले.६. राज्यामध्ये ब-याच ठिकाणी प्रयो. सहाय्यक पदे अतिरीक्त झाली आहेत सदर पदे ९ वी १० च्या विदयार्थी संख्येवर असल्याने सरमण्से शान स्वावरी प्रयत्न करून ती ६ वी ते १० वी च्या विदयार्थी संख्येचचर करण्यात यावीत.७. संस्थानी विना अनुदान चालवलिल्या तुकडीवर विना अनुदान शिक्षकेत्तर कर्मचारी नेमण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी पत्र काढावे.
सिंधुदुर्ग रत्नागीरी जिल्हयातील माध्यमिक विभाग व वेतन दरबारी मंजूर करून घेऊन ती तात्काळ भरावी अशी विनती करण्यात आली ९. गेल्या वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये शिक्षणीकारी माध्य तसेच शिक्षण उपसंचालक
कार्यालयाकडून सहविचार सभा लावल्या नसल्याने शिक्षकेत्तर अधिवांचेच प्रश्न प्रह आहेत याबाबत शिक्षण उपसंचाचलक तसेच दोनही जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी यांना आमदार म्हात्रे यांनी सूचना दिल्या यावेळी शिक्षण उपसंचालक चौथे यांनी स्वतः सिंधुदूर्ग जिल्हयामध्ये पंधरा दिवसात येऊन निकाली काढण्याचे आश्वासित केले.

सदर सभेस महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे श्री गजानन नानचे विभागीय सचिव कोल्हापूर तथा सिंधुदूर्ग जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे सचिव तसेच माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अंतर्गत तपासणीस तथा जिल्हाध्यक्ष रत्नागीरी श्री रामचंद्र केळकर रत्नागौरी व इतर माठ्या संख्येने शिक्षकेत्तर बांधव उपस्थित होते