लांजा ( प्रतिनिधी) अण्णाभाऊ साठे दलित वस्ती अंतर्गत मागासवर्गीयांसाठी असलेला निधी अन्य प्रभागात वळविण्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला बसलेल्या लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक लहू कांबळे यांची आज दुसऱ्या दिवशी खालावली आहे आहे.
अण्णाभाऊ साठे दलित वस्ती अंतर्गत मागासवर्गीयांसाठीv असलेला आपल्या प्रभाग क्रमांक ४ मधील निधी अन्य प्रभागात वळविण्याच्या निषेधार्थ लांजा नगरपंचायतीचे नगरसेवक लहू कांबळे यांनी प्रजासत्ताक दिनी लांजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे. आज सोमवारी दुसऱ्या दिवशी सकाळपासून नगरसेवक लहू कांबळे यांची प्रकृती खालावली आहे.











