खेड जेसीज कडून संविधान जनजागृती फलक

खेड(प्रतिनिधी) २६ जानेवारी  रोजी भारताचे सविंधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली त्याचे निम्मित साधून आणि संविधानाबद्दल नागरिकामध्ये जनजागृती होण्याकरीता जेसीआय खेड कडून तहसिल कार्यालयातील प्रवेशद्वारावर भारताचे सविंधान असलेले फलक लावण्यात आले असून त्याचे अनावरण खेड चे उपविभागीय जिल्हाधिकारी  शिवाजीराव जगताप तहसिलदार सुधीर सोनावणे यांचे हस्ते करण्यात आले
.खेड जेसीआय कडून खेड मधील सर्व शासकीय कार्यालयात सविधांचे फलक लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली, सदर कार्यक्रम प्रसंगी माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, बाबाजीराव जाधव, गौस खतीब ,संजय मोदी ,पप्पू चिकणे, खेड जेसीआयचे अध्यक्ष अमर दळवी, सेक्रेटरी कपिल कोळेकर सर्व जेसीआय चे पदाधिकारी आणि माजी अध्यक्ष, खेड मधील नागरिक ,पत्रकार ,विद्यार्थी आणि शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम प्रमुख म्हणून जेसी स्वप्नील कदम यांनी काम पाहिले.