आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू प्रशांत सावंत यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते विशेष सन्मान

खेड(प्रतिनिधी) श्री प्रशांत महेंद्र सावंत यांनी राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी करून रत्नागिरी जिल्ह्याचा मान वृद्धिंगत केल्याबद्दल जिल्हा परिषद रत्नागिरी समाज कल्याण विभाग (५% दिव्यांग कल्याण)गुणवंत खेळाडू दिव्यांग प्रोत्साहन पुरस्कार  श्री.उदय सामंत मंत्री (उद्योग,मराठी भाषा)महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री रत्नागिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा अधिकारी एम देवेंदर सिंह , पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी , मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार , रत्नागिरी जिल्हा समाज कल्याण अधिकारी जयेंद्र जाधव , प्रताप कांबळे , हर्षल रसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या वतीने प्रशांत सावंत यांचे खास कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.