खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील शिवतर गावचे सुपुत्र,सैन्य दलात १७ वर्षे सेवा केल्यावर हिंदुजा हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले संतोष जयसिंग मोरे हे हिंदुजा रुग्णालयातुन सेवानिवृत्त झाले आहेत.
श्री संतोष मोरे यांनी सैन्य दलात १७ वर्षे सेवा बजावली दरम्यान भोपाळ,झाशी,अरुणाचल बर्फात, एन एस जी -ब्लॅक कॅट,पठाणकोट,सिकंदराबाद अशा अनेक ठिकाणी खडतर नोकरी करून निवृत्त झाल्यावर ,माहीम येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे २३ वर्षे नोकरी केली,तेथे येणाऱ्या ओळखीच्या लोकांना ते सातत्याने,आवर्जून मदत करीत असत.
त्यांना समाजकार्याची आवड असून वाडीतील हनुमान मंदिरातील मंडळात ते सक्रिय पदाधिकारी असून सर्व कार्यक्रमात ते आवर्जून पुढे असतात. त्यांच्या सेवा निवृत्त पर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय के चव्हाण
यांनी शुभेच्छा दिल्या










