चिमणी पाखरं डान्स अकॅडमीकडून पाच जणांना नृत्य शिष्यवृत्ती!

मसूरे | झुंजार पेडणेकर : शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ संस्थे कडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पाच कलाकारांना जिल्ह्यात प्रथमच नृत्य शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.

या मध्ये कु.सई रामदास राऊळ(केळूस)

कु.वेदश्री महेश दाभोलकर(म्हापण)

कु.निधी गिरीधर केळूसकर(निवती)

कु.सिमा संजीव चव्हाण(निवती)

कु.युक्ती संतोष हळदणकर(कोचरा)

या सर्व पाच नृत्य कलाकारांना या वर्षीची नृत्य शिष्यवृत्ती जाहीर झाली असून प्रत्येकी प्रमाणपत्र आणि वार्षिक 12000 रुपये असं या शिष्यवृत्ती च स्वरूप आहे.

नृत्य क्षेत्रासाठी दिली गेलेली शिष्यवृत्ती ही या जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.

प्रथमच शिष्यवृत्ती मिळालेल्या या नृत्य कलाकारांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नृत्य कलाकारांना नृत्य शिष्यवृत्ती देण्याचा चिमणी पाखरं संस्थेचा मानस आहे.

हा कार्यक्रम प्रमुख मान्यवारांच्या उपस्थितीत येथील शासनमान्य संस्था चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ डान्स स्टुडिओ येथे पार पडला.

यावेळी चिमणी पाखरं संस्थेचे अध्यक्ष रवि कुडाळकर,विनोद जाधव,सतिश पावसकर,रामदास राऊळ,निखिल कुडाळकर,संजना पवार,तन्मय आईर,पालक नृत्य शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते.