
देवगड (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजप च्या वतीने 5 एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता इको व्हीलर ग्रुप देवगड सायकल रॅली (देवगड सायकलोथॉन ) चे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचा शुभारंभ माजी आम. ऍड अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तसेच जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष राजा भुजबळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी बाळ खडपे, भाजप सर चिटणीस योगेश चांदोस्कर महेश जंगले युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील नगरसेवक शरद ठुकरूल, रोहन खेडेकर, उष:कला केलुसकर,ऍड अभिषेक गोगटे अल्पसंख्याक अध्यक्ष सर्फराज शेख, माजी नगरसेवक उमेश कणेरकर बापू जुवाटकर,रविंद्र कोयंडे, विश्वामित्र खडपकर संजय तारकर, विजय वाळके,ज्ञानेश्वर खवळे,तन्वी शिंदे वा अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
इको व्हीलर ग्रुप देवगड च्या वतीने आयोजित करण्यात आलेली सायकल रॅली शालेय गट बारा वर्षे पर्यंत व खुला गट या दोन गटात होणार असून शालेय गटांकरिता अकरा किलोमीटरचे अंतर व खुल्या गटा करता 25 किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले होते शालेय गटा करीता जामसंडे भाजप कार्यालय ते मिठमुंबरी पूल ते जामसंडे भाजप कार्यालय तर खुल्या गटाकरिता जामसंडे भाजप कार्यालय ते
कातवण पेट्रोल पंप ते जामसंडे भाजप कार्यालय असा मार्ग निश्चित केला होते या सायकल रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या व सायकल रॅली पूर्ण करणाऱ्या सायकल स्वार यांना मोफत टी-शर्ट मेडल आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरां च्या हस्ते गौरवि ण्यात आले.










