ॲड.विक्रम भांगले यांची ३८ व्या नॅशनल गेम्स मध्ये आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीचे सुपुत्र आणि नेमबाजी या खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक ॲड. विक्रम भांगले यांची उत्तराखंड डेहराडून येथे सुरु झालेल्या ३८ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते आज झाले.

ॲड. विक्रम भांगले हे सुप्रिय कोर्ट ऑफ इंडियाचे वकील असून त्यांनी आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स अशा अनेक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्युरी , प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी तसेच आयोजन समिती सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.