डॉ. नातू महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

चिपळूण :– डॉ.नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय,मार्गताम्हाने महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महाविद्यालायातील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

 

 

कार्यक्रमाची सुरुवात स.प्रा. शाहरुख चोगले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची स्थापना, उद्दिष्टे, तसेच तरुण मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन दिले.यानंतर इतिहास विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्र राजे लोकशाही बळकट करण्याकरिता मतदान दिवसाचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव होते.लोकशाहीत मतदानाचे महत्व सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहन दिले.तसेच नवीन मतदारांना आपली नोंदणी करण्याचे आवाहन केले.

 

 

यानंतर स.प्रा.विक्रांत टेरवकर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.प्रा. शाहरुख चोगले यांनी केले, तर स.प्रा.सुप्रिया वाघे यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण झाली आणि त्यांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्धार केला.