खेड(प्रतिनिधी) संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने फेब्रुवारीत संकल्प चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून जमा होणाऱ्या रकमेतून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावर्षीही संकल्प चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यातून जमा होणाऱ्या निधीतून गरजूंना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील विजेत्यास १३ हजार रुपये, उपविजेत्यास ७ हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तृतीय व चतुर्थ क्रमांकांनाही चषक देऊन गौरवण्यात येईल. सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागासाठी चेतन शिंगरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे









