खेड (प्रतिनिधी) खेड रेल्वेस्थानकासमोर एटीएम मशिन अखेर कार्यान्वित झाल्याने मुंबईहून गावी येणाऱ्या प्रवाशांची चिंता मिटली आहे. याआधी रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर रक्कम काढण्याकरिता शहराच्या ठिकाणी जावे लागत होते. रेल्वेस्थानकासमोर सुरू झालेल्या एटीएम मशिनमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे स्थानकासमोर एटीएम मशिन सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, ही बाब कुठल्याही बँकांनी फारशी मनावर न घेतल्याने मुंबईहून गावी येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. आर्थिक भुर्दंड सहन करून शहर अथवा भरणे गाठावे लागत होते. काही दिवसापूर्वीच रेल्वेस्थानकासमोर हिटाची बँकेने एटीएम मशिन बसवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार एटीएम मशिन कार्यान्वित झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.









