रत्नागिरी ः प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पोलिस चौकिच्या दारात पोलिस हवालदाराला सर्पदंश झाला. ही घटना शनिवार 25 जानेवारी रोजी रात्री 9.15 वा. सुमारास घडली.
संजय मधूकर जाधव (50,रा.फगर वठार,रत्नागिरी) असे सर्पदंश झालेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. शुक्रवारी रात्री ते हातखंबा येथील वाहतुक पोलिस चौकिच्या दारात उभे होते. त्यावेळी अचानकपणे त्यांच्या पायाला घोणस सापाने दंश केला. ही बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांच्या इतर सहकार्यांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. संजय जाधव यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी सांगितले.











