असनिये येथे एक राखी वृक्ष संवर्धनासाठी कार्यक्रम संपन्न.

असनिये : श्री शिव छत्रपती माध्यमिक विद्यालय, असनिये येथे ‘एक राखी’ उपक्रमांतर्गत वृक्ष संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे हा होता.

श्रीमती जान्हवी सावंत, श्री राठोड सर, श्री देसाई सर, श्री जी. बी. सावंत, श्री कुडव, श्रीमती देसाई आणि श्रीमती शारदा सावंत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व आणि त्यांचे संगोपन करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी ‘राखी’ बांधून वृक्षसंवर्धनाची ग्वाही दिली आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन शाळा प्रशासन आणि शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.