चिपळूण : महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्याने बेसुमार महागाई वाढली आहे. मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आई जेवू घाली ना, बाप भीक मागून देत नाही. अशी अवस्था आहे. निवडणुकीनंतर प्रत्येक वस्तूचे दर भडकले आहेत.
महागाईने कहर केला आहे. जीवनावश्यक वस्तू महाग झाले. धान्यांचे दर गगनाला भिडलेले. एस.टी भाडेवाढ, मागास, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना सर्व मोफत, ८० कोटी जनतेला धान्य मोफत, ज्यांची कार्ड केशरी धारक आहेत, त्यांचे रेशन बंद. दारिद्रय रेषेखालील काही जण धान्य रेशन दुकानदाराकडून धान्य मोफत घेऊन विकतात. एस.टी मध्ये स्त्री, पुरुष असमानता आहे. घटनेने, संविधानाने सर्वांना समान हक्क, अधिकार दिले. एस.टी. महामंडळाने पुरुषांनाही सर्वांना अर्धे तिकीट व महिलांना अर्धे तिकीट सवलत आहे. तशी पुरुषांनाही आर्थिक सवलत राज्य शासनाने द्यावी. स्त्री पुरुष भेदभाव करू नये. मध्यमवर्गीय भिकारी होण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक बजेटमध्ये न्याय द्यावा. अशी मध्यमवर्गीयांची मागणी आहे.











