खगोलतज्ञ आदित्य देसाई यांचे मार्गदर्शन : तळगाव हितवर्धक संघ मुंबई यांचा उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : तळगाव हितवर्धक संघ, मुंबई या शैक्षणिक संस्थेने श्री रामेश्वर विद्यालय, तळगाव मालवण येथे विदयार्थ्यांसाठी खगोलशास्त्राचा परिचय, ताऱ्यांची ओळख आणि दुर्बिणीतून ग्रहदर्शन असा कार्यक्रम संपन्न झाला. मुंबईतील खगोलतज्ञ आदित्य देसाई यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले. दोन टेलिस्कोप द्वारे विदयार्थ्यांना ग्रह, तारे, तारका. समुह दर्शन घडवण्यात आले.
तळगाव हितवर्धक संघाने रामेश्वर विद्यालय, तळगाव विदयार्थ्यांसाठी खगोलशास्त्राचा परिचय, ताऱ्यांची ओळख आणि दुर्बिणीतून ग्रहदर्शन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुंबईतील खगोलतज्ञ आदित्य देसाई यांनी यावेळी मुलांना मार्गदर्शन केले.
तळगाव हितवर्धक संघांचे अध्यक्ष आनंद दळवी, सचिव अनिल दळवी, माजी अध्यक्ष श्री सूर्यकांत दळवी तसेच कार्यकारी मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.
शालेय समिती अध्यक्ष उत्तम दळवी, मुख्याध्यापिका सौ. शैलजा शिरोडकर तसेच इतर शिक्षकवृंद यांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हायला मेहनत घेतली. श्री रामेश्वर हायस्कुलचे सर्व विद्यार्थी तसेच बाहेरील शाळेतील निवडक विद्यार्थी, वराड हायस्कुलचे शिक्षक, कुडाळचे खागोलप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी श्री रामेश्वर हायस्कुल, तळगाव येथे करियर गप्पा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आदित्य देसाई यांनी विदयार्थ्यांशी पुढील करियर सदर्भात मार्गदर्शन केले. आदित्य देसाई हे मद्रास आयआयटीचे एम टेक असल्यामुळे हायस्कुलच्या अत्याधुनिक लॅबची पाहणी त्यांनी केली व शिक्षकांनाही काही आवश्यक मार्गदर्शन केले.









