निर्मल ग्रुप ग्रामपंचायत कणगवली येथे पार पडले आरोग्य तपासणी शिबिर 

लांजा( प्रतिनिधी) प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी, उपकेंद्र तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मल ग्रुप ग्रामपंचायत कणगवली येथे नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले .

१५ व्याश वित्त आयोगांतर्गत घेण्यात आलेल्या या शिबिरात कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात आले. आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्या विविध आजारांविषयी माहिती देण्यात आली. तसेच सर्व महिलांची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग (एनबीडी) अंतर्गत तपासणी करण्यात आली .

या कार्यक्रमाला कणगवली ग्रामपंचायत सरपंच श्रीम. संपदा चव्हाण, उपसरपंच विठ्ठल इंगळे, शिपोशी प्राथमिक आरोग्य केंद्रा चे वैद्यकीय अधिकारी श्रीमती सायली मिसाळ ,आयुष्यमान आरोग्यमंदिर तळवडेचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दि.रा. काष्टे, ग्रामसेवक श्रीमती नंदिनी कांबळे तसेच सदस्या दीप्ती इंगळे, रश्मी चव्हाण, आरोग्य सहाय्यक ए.बी. वाघाटे, आरोग्य सेविका श्रीम. पी.पी. गोसावी, आरोग्य सेवक ए. व्ही.माने व आशा सेविका सान्वी शेलार आधी उपस्थित होते. तसेच रक्त तपासणीसाठी श्रीमती क्रांती कांबळे -शिपोशी उपस्थित होत्या. तसेच गावातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या