जि प पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ मराठी या शाळेला ८५ वर्षे पूर्ण

District Purna Primary School Veral Marathi school completed 85 years

या निमित्ताने बुधवारी १७ मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरळ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ या शाळेला ८५ वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने बुधवारी १७ मे रोजी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वेरळ शाळेला ८५ वर्ष पूर्ण होत असल्याने या निमित्ताने बुधवारी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रोग निदान व उपचार, नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे .रात्री ८ वाजता स्वागत आणि सत्कार समारंभ होणार असून त्यानंतर लकी ड्रॉ सोडत काढण्यात येणार आहे. रात्र ९ वाजता शाळेच्या मदतीसाठी राज्य नाट्य स्पर्धा गाजवणारे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग केंद्रात प्रथम क्रमांक पटकावणारे साई कला मंच कुडाळ निर्मित दोन अंकी नाटक बाकी शून्य या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शालेय सुधार समिती, ग्रामीण मुंबई व पुणे , पूर्ण प्राथमिक शाळा वेरळ मराठी चे सर्व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत