
कोंडगाव येथील श्री रेमणे बंधू यांच्या ‘श्रीपाद निवास’ या निवासस्थानी लोकप्रिय ग्रामपुरोहित आणि तपस्वी ब्रम्हीभूत श्रीपादस्वामी रेमणे यांचा 43 वा पुण्यतिथी उत्सव मिती माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी म्हणजेच दिनांक ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी 2025 या काळात संपन्न झाला. यादरम्यान समाधी स्थानी नित्य पवमानसूक्त पठण सेवा, वे.मू. श्री अरुणकाका नवाथ्ये व श्री अशोककाका नवाथ्ये गुरुजी यांनी केली.
दिनांक ३० रोजी संध्याकाळी स्थानिक कलाकार श्री प्रदीप शिंदे आणि सहकारी यांची भजनसेवा झाली. ३१ रोजी सामुदायिक नामस्मरण सेवा, दिनांक १ रोजी महिला मंडळातर्फे सामूदायिक विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र सेवा व हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. दिनांक २ रोजी मुख्य पुण्यतिथी उत्सव निमित्त श्राद्धविधी, तीर्थराज पूजन, यती आराधना, महाप्रसाद.तसेच संध्याकाळी ह. भ. प. अमेयबुवा गुण्ये रामदासी यांची कीर्तन सेवा झाली. त्यांना तबला साथ श्री निखिल रानडे आणि हार्मोनियम साथ श्री संतोष आठवले या प्रसिद्ध कलाकार मंडळींनी केली. याप्रसंगी खल्वायान संस्थेचे कार्यवाह श्रीनिवास जोशी, ह. भ. प. भाट्ये बुवा आणि मान्यवर उपस्थित होते.










