जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा पुढाकार –
मंडणगड | प्रतिनिधी – माता रमाई आंबेडकर यांच्या जंयती निमीत्त वणंद ता. दापोली व भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे आंबेडकर यांचे मंडणगड तालुक्यातील मुळ गाव आंबडवे येथे दी. 6 व 7 फेब्रुवारी रोजी दरवर्षी भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो अनुयायांची प्रवासातील गैरसोय दूर व्हावी, त्यांचा प्रवासाचा क्षीण कमी व्हावा या करिता मोफत चहा, पाणी, नाष्ठा, जेवण, प्राथमिक वैद्यकीय सुविधा आदी सुविधा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) तालुका मंडणगड यांच्यावतीने उपलब्ध करून दिल्या जातात. या उपक्रमाची याहीवर्षी मंडणगड – दापोली फाटा भिंगळोली येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ ) चे राज्यकार्यकरणी सदस्य दादासाहेब मर्चंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, सरचिटणीस रामदास खैरे, जिल्हा संघटक विजय खैरे, किरण पवार, युवक अध्यक्ष संकेत तांबे, संकेश कासारे, गौरव मर्चंडे, विधान पवार, आकाश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते यासाठी मेहनत घेत आहेत.
आरपीआय तालुका शाखा मंडणगडच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हा उपक्रम राबिवण्याचा तिसरा वर्ष आहे. या उपक्रमाचे अनेक स्तरांतून कौतुक होत असते.










