मारुती आळीतील इमारतीला लागली आग 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मारुती आळी येथील एका इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली. धुर येऊ लागल्याने तत्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि आग विझवण्यात आली. त्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात आले.