शशिकांत चव्हाण यांना राज्यस्तरीय कोकण गौरव पुरस्कार*l

मोडकाआगर | वार्ताहर : शिव आरोग्य सेना रत्नागिरी जिल्हा सह समन्वयक शशिकांत मारुती चव्हाण यांच्या आरोग्य सेवेच्या कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय कोकण गौरव पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. तसेच आजतागायत त्यांना राज्यस्तरीय 15 पुरस्कार मिळाले त्याबद्दल व जनसेवेबद्दल शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने मुंबई येथे शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर जी ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ.जयवंत गाडे सरचिटणीस, जितेंद्र दगडू सकपाळ व महाराष्ट्रातील इतर पदाधिकाऱ्यांच्या समवेत जाहीर सत्कार करण्यात आला.