
देवगड मधील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद फाटक यांचे नुकतेच निधन झाले. बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. मुकुंद फाटक यांच्या जाण्याने आपण ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांच्या पत्नी विजया फाटक, बंधू पुरुषोत्तम फाटक, माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, योगेश पाटकर, दया पाटील, शरद ठुकरूल, संतोष किंजवडेकर, राजेंद्र शेट्ये, योगेश चांदोसकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.










