रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं.1 येथे रेल्वे सुरक्षा बलाने एकाला पकडले

32 हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी ः प्रतिनिधी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं.1 येथे रल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून 32 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. ही घटना शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वा. सुमारास घडली.

संतोषकुमार अशोककुमार कुपगीरमठ (29,रा.जि.बिदर,कर्नाटक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री कोकण रेल्वे सुरक्षा बलाला प्लॅटफॉर्म नं.1 येथे एक संशयित दिसून आला. त्याच्याकडे असलेल्या वस्तुंबाबत त्याला स्पष्टीकरण देता न आल्याने त्यांनी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या अंगझडतीत 30 हजारांचा लॅपटॉप, चॉर्जर, इअर बडस आणि ब्ल्यू टूथ असा एकूण 32 हजारांचा मुद्देमाल मिळून आला.