The light board caught fire in the section of the secondary registrar category class 1 in Kankavali Tehsildar’s office..!
कर्मचाऱ्यांची झाली धावपळ | सुदैवानं पुढील प्रसंग टळला
कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली तहसीलदार कार्यालय येथील दुय्यम निबंधक श्रेणी १ येथील कार्यालयात लाईटच्या बोर्डने पेट घेतला. त्यामुळे कार्यालयात संपूर्ण आगीचा धूर पसरला होता. त्यामुळे कर्मचारी वर्गाची मोठी धावपळ उडाली.
कणकवली तहसीलदार कार्यालय हे कणकवली तालुक्यातील मध्यवर्ती कार्यालय असल्यामुळे येथे नागरिकांची ये – जा असते. मात्र कार्यालयातील लाईट बोर्ड ने पेट घेतल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले व एकच तारांबळ उडाली. कर्मचारी व नागरिक यांच्या प्रसंगावधनाने आग तात्पुरती उपाय करून विजविण्यात आली.