चिपळूण (प्रतिनिधी):- रोहिदास समाज सेवा संघ ता. खेड या सामाजिक संघटनेतर्फे खेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू पार पडला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावी शेकडो समाज बांधव भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी श्री रोहिदास महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संघाच्या कार्यकारणी मंडळाच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली. नंतर संत शिरोमणी श्री रोहिदास महाराजांची आरती म्हणण्यात आली.
महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने समाजभगिनी उपस्थित होत्या. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजबांधव व भगिनींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विजय सुसविरकर, सुभाष खोपकर, पत्रकार दिलीप देवळेकर, संतोष विठू सावर्डेकर, संतोष तुकाराम सावर्डेकर, विजय सुसविरकर, ह. भ. प. शंकर कदम, नवनाथ कदम, गणेश कदम, रामदास कराडकर, आदी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तर विशेष सन्मान तालुकाध्यक्ष दिनेश शिरीषकर यांचा समाजातर्फे करण्यात आला.
यानंतर रोहिदास समाज सेवा संघाचे खेड तालुकाध्यक्ष दिनेश शिरिषकर यांनी आपल्या मनोगतात संत शिरोमणी श्री रोहिदास महाराजांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला. उपाध्यक्ष संतोष सावर्डेकर यांनी संत रोहिदास महाराजांची विचार अमलात आणताना सद्य परिस्थितीला अनुसरून समाजबांधवांनी विकासात्मक भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन केले. तर सदस्य बळीराम कराडकर यांनी देखील आपले मनोगत मांडले. तर शाहीर नथुराम खेडेकर यांनी संत रोहिदास महाराजांवर सुश्राव्य गीत सादर करून समाजबांधवांची मने जिंकली.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष संतोष दयाळकर, कार्याध्यक्ष प्रकाश हेलगावकर, कोषाध्यक्ष प्रकाश इनरकर, संघटक परशुराम पेवेकर, सचिव सुभाष खोपकर, सहसंघटक विजय सुसविरकर, संघटक शंकर कदम, सहसचिव श्रीकांत देवळेकर, सहसचिव नारायण शिरकर, सदस्य सखाराम खेडेकर, गणेश शिरकर, विभाग प्रमुख संजीवन कदम, आनंदा कदम, महेश पेवेकर, रोशन बुतकर, नामदेव दयाळकर, राजेंद्र कदम, मनोहर दयाळकर, भार्गव नांदगावकर, हरिश्चंद्र खेडेकर, संजय खेडेकर, चंद्रकांत खेडेकर, ह. भ. प. अनंत कदम, मोहन कराडकर, अरुण कराडकर, प्रकाश पेवेकर ,दिनेश आंबडसकर ,मोतीराम आंबडसकर, संतोष पेवेकर, सोनू पेवेकर तसेच महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.











