End of March 2023 of Chiplun Civil Credit Institution
३३ कोटी व्यवसाईक नफा व १८५६ कोटीचा व्यवसाय
चिपळूण | प्रतिनिधी : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ २९ वर्षाच्या कार्यकाळात सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. मार्च २०२३ अखेर संस्थेला व्यवसायिक नफा ३३ कोटी झाला असून संस्थेने १८५६ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेची मार्च २०२३ अखेर सभासद संख्या १ लाख ३८ हजार ३२९, भाग भांडवल ६६ कोटी ४० लाख तर एकूण स्वनिधी १३० कोटी ९९ लाख आहे. फक्त २९ वर्षाच्या कालखंडात सभासद संख्या व भाग भांडवल व स्वनिधी वाढीमध्ये राज्यातील काही निवडक संस्थामध्ये या संस्थेचा समावेश होतो. संस्थेच्या ठेवी १०२८ कोटी १९ लाख एकूण कर्जव्यवहार ८२८ कोटी १७ लाख त्यापैकी सोनेतारण कर्ज ३१८ कोटी १६ लाख तर एकुण प्लेज लोन ३६० कोटी २५ लाख संस्थेची बँकेतील एकूण गुंतवणूक ४३१ कोटी ९२ लाख आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय १८५६ कोटीचा असुन तो २०२५ पर्यंत २५०० कोटीचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे सर्वत्र मंदीचे वातावरण असुनही संस्थेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा क्षमतेचे सातत्य राखले आहे. कोविडच्या काळातसुध्दा संस्थेने कामकाज अखंडपणे चालु ठेवत ग्राहकांना नियोजनबध्द, नम्र व जलदसेवा दिली आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या आदर्श प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबध्द प्रयत्न केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केले आहे.
संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम आहे. संस्थेचे एकूण स्वनिधी १३१ कोटी असुन संस्थेने आपल्या आर्थिक सक्षमतेबरोबरच सामाजिक बांधीलकी जपण्यात यशस्वी झाली आहे. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणूकीवर जास्तीत जास्त मोबदला दिला जातो. गेली २४ वर्षे संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या भागभांडवलावर १५ टक्के डिव्हींडंट देत आहे. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. संस्थेच्या आर्थिक सक्षमते बरोबरच संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी प्रतिवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. सभासदांच्या मुलांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी सुलभ पद्धतीने अर्थपुरवठा करण्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणेसाठी सातत्याने वेगवेगळया क्षेत्रातील तज्ञांची माहितीपर मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवण्यात येत असतात. या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना शेती पुरक जोडधंदा उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेने पुढील ५ वर्षात किमान ५ हजार शेतकऱ्यांना शेतीपुरक दुग्ध व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम कार्यान्वीत केला असून त्याला संस्थेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात फार मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्याशिवाय वेगवेळया स्वयंरोजगाराच्या माध्यतातून पुढील ५ वर्षात २५ हजार बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी काम चालू आहे.
समाजातील अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न गटातील घटकांसाठी त्यांची भविष्यातील स्वप्ने साकारता येतील अशा काही ठेव योजना कार्यान्वीत केल्या असून लहान मुलांवर बचतीचे संस्कार घडविणारी “धनलक्ष्मी ठेव” योजना कार्यान्वीत केली असून आता पर्यंत ४३ हजार २०० हून अधिक लहान मुलांच्या पालकांनी त्यांची बचतीची खाती सुरू केली असुन ही ठेव योजना लहान मुलांवर बचतीचे संस्कार घडविणारी ठेव योजना म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय झाली आहे. दरमहा सरासरी ३० लाखाहुन अधिक रक्कम या खात्यांत जमा होत असते.त्याशिवाय अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सभासदाना त्यांच्या भविष्यातील स्वप्ने साकारण्यासाठी १ वर्षापासून १० वर्षापर्यंतच्या कालावधीच्या एकूण दहा (१०) आवर्तक ठेव योजना कार्यान्वीत करण्यात आल्या असून या योजनेचे ५५ हजाराहून अधिक ठेव खातेदार असून दरमहा साधारण ५ कोटी १० लाखाहुन अधिक रक्कम त्यांच्या आवर्तक ठेव खात्यात जमा करीत असतात. यावर्षी “राष्ट्र अमृतवर्ष” साजरे करत असताना संस्थेने “राष्ट्र अमृतमहोत्सव” मासिक ठेव व “राष्ट्र अमृतमहोत्सव” मुदत ठेव या दोन ठेव योजना कार्यान्वीत करून या ठेव योजनेच्या माध्यमातून ठेव खातेदार रक्कम रु. १३ कोटी ५० लाखाहुन अधिक ठेव रक्कम जमा करीत आहे. अशा पदधतीने आर्थिक घटकांवर बचतीचे संस्कार घडविण्याचे काम संस्थेने केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कामाबाबत या आर्थिक वर्षात सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच सन २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट कामकाज केलेल्या सहकारी पतसंस्था म्हणून बँको-पतसंस्था ब्ल्यू रिबनने सन्मानित केले आहे व सकाळ गृप वतीने आयडॉल ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव यांना वूमन इन्फल्यूएन्सर हा पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी संस्था आदर्शवत कामकाज करत आहे. पारदर्शकता, अखंड सेवा साधना, अर्थकारणाबरोबर समाजसेवा व सामाजिक बांधिलकी जपून संस्थेने मोठया दिमाखात ३० वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आणि १ हजार कोटी ठेवी पुर्तता सोहळा दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी अनिल कवडे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व विद्याधर अनास्कर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच सहकार खात्यातील आजी, माजी अनेक प्रमुख अधिकाऱ्यांचे उपस्थितीत साजरा केला.
संस्था आपल्या सभासदांच्या हिताचे रक्षण करीत असतानाच सहकारातील अन्य संस्थांनाही मार्गदर्शन व शिक्षण प्रशिक्षणाची सोय व्हावी या साठी संस्थेने अद्यावत सहकार प्रशिक्षण केंन्द्र सुरू केले असून या प्रशिक्षण केन्द्रामार्फत सातत्याने प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून चालु आर्थिक वर्षात दि. २९ एप्रिल रोजी “संकल्पपुर्ती मेळावा”, दि. ११ मे रोजी “सहकार अर्थसाक्षर मेळावा” घेऊन शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे काम केले आहे व असेच काम संस्था अखंडपणे करत आहे.सहकाराच्या मुळ उद्देशाप्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांसाठी आर्थिक आधार देणेसाठी व त्यांना बचतीची सवय लागावी यासाठी “सहकार समृध्दी” हा महत्त्वकांक्षी संकल्पपूर्ती आराखडा तयार करण्यात आला असुन तो यशस्वीपणे राबवण्यासाठी संस्थेच्या सर्व हितचिंतकांचा, सभासदांचा आणि सहकाराबद्दल आत्मीयता असणाऱ्या असंख्य कार्यकार्त्यांचा मोलाचा सहभाग मिळत असुन आपले नियोजीत उद्दिष्ट पुर्ण करण्याची परंपरा आपण याही बाबतीत सिध्द करु. “आपली माणसे-आपली संस्था” हे ब्रीद वाक्य खऱ्या अर्थाने सिध्द करण्यात सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, संचालक, समन्वयक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.