पुणे येथे सौ पूजा निकम यांना कोकण भूषण पुरस्कार प्रदान
महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची उपस्थिती
संतोष कुळे lचिपळूण : अखिल कोकण युवा संघ पुणे यांच्या वतीने संघाच्या ९ व्या वर्धापन दिनी चिपळूण तालुक्यातील पंचायत समितीच्या माजी सभापती सौ पूजा शेखर निकम यांना कोकण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे धायरी मुक्ताई गार्डन येथे अखिल कोकण युवा संघ ट्रस्ट पुणे यांचा ९ वा वर्धापन दिन आणि कोकण भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. शंकर मांडेकर, पुणे महानगरपालिका नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेवक सचिन दांगट, भाजप नेते किशोर पोकळे, दिनेश धाडवे, नगरसेवक सौ. छाया मारणे, संचालिका कॉसमॉस बँक रेखाताई पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा स्वाती पोकळे, शिक्षण मंडळ पुणे बाबा धुमाळ, नगरसेविका अश्विनी जाधव, डॉ. मंदार कोल्हे आदि मान्यवर उपस्थित होते.
अखिल कोकण युवा संघटनेच्या वतीने कोकण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी चिपळूण तालुक्यातील आमदार शेखर निकम यांच्या पत्नी आणि पंचायत समितीच्या माजी सभापती सौ पूजा शेखर निकम यांना सुद्धा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोकण भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सौ पूजा निकम यांनी सांगितले की, हा पुरस्कार माझा नसून माझ्या कोकणाचा, चिपळूण तालुक्याचा , माझ्या गावाचा आणि माझ्या सर्व महिलांचा सन्मान आहे. कारण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. जिथे महिला आणि त्यांचा सन्मान केला जातो तिथेच लक्ष्मीचे नेहमी वास्तव्य असते. त्यामुळे अखिल कोकण युवा संघ पुणे यशाची उंची गाठणार यात काही शंका नाही. माझे सासरे स्वर्गीय गोविंदराव निकम यांनी केलेल्या कार्याचा वारसा आम्ही निकम कुटुंबीय पुढे नेत आहोत . स्व. गोविंदराव निकम यांचे कार्य आमच्यासाठी स्फूर्तीदायक आणि प्रेरणा देणारे आहे. तळागाळातील महिलांसाठी काम करताना राधा गोविंद फाउंडेशनच्या वतीने अनेक उपक्रम राबवता आले. यातूनच लोकांपर्यंत तळागाळात पोहोचता आले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी प्राप्त झाली. सभापती असताना तालुक्यातील अनेक गावांना विकास प्रक्रियेत आणता आले. तालुक्यातील तीन गावे स्पर्धेत आणून त्यांना शासनाकडून पारितोषिक मिळवून दिले. यासाठी मला लोकांचे सहकार्य ही लाभले. अनेक महिलाना मदतीचा हात देता आला. शेतीविषयक कार्यक्रम करून जागृती करण्यासाठी प्रयत्न करता आले. मात्र, समाजासाठी काम करताना कुठेतरी राजकारणाची झालर घ्यावी लागते. आपण मला पुरस्कार देऊन माझी जबाबदारी वाढवली आहे. कोकण युवा संघाचे काम आणि त्यांची समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे, असे त्यांनी गौरोदगार काढले.
यावेळी पूजा निकम यांचे एका मुलाने हुबेहूब स्केच बनवले आणि त्यांना दिले. ते पाहून सौ. निकम यांना अत्यानंद झाला.
कार्यक्रमात अनेक पुरस्कार वितरण करण्यात आले.
अखिल कोकण युवा संघ पुणे वर्धापन दिन सोहळा करण्यासाठी गेले दोन महिने पदाधिकारी कार्यकर्ते घटत येते कार्यक्रम साकारण्यात आला संघाचे अध्यक्ष गणेश जाधव सचिव सचिन होती कर खजिनदार सुरेश शिगवण प्रवीण मुकणात भगवान शिंदे, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महिला मंडळाचे अध्यक्षा शोभा जाधव, कार्याध्यक्षा संपदा शिगवण, उपाध्यक्ष प्रियंका उतेकर, सचिव रसिका मोरे, खजिनदार प्रतीक्षा मुकनाक आणि सर्व महिला सर्वांनीच मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.











